रोहित शर्मा होणार सारळचा रहिवाशी

4 एकर जागा केली 9 कोटी रुपयांना खरेदी

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जागतिक दर्जाचे क्रिकेटर सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, अजित आगरकर, विराट कोहली हे अलिबागकर झाले असताना आता भारतीय क्रिकेट संघाचा आघडीचा फलंदाज रोहित शर्मा याला सुद्धा अलिबागच्या सौंदर्याची भुरळ पडली आहे. अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदरा जवळील सारळ या गावात रोहित शर्माने 4 एकर जागा 9 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. जमिनीची रजिस्टरी करण्यासाठी रोहित शर्मा सपत्नीक आज अलिबागच्या दुय्यम निबंधक कार्यालयात आला होता. रोहित शर्मा आल्याचे कळताच त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.

क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि वृषभ पंत हे देखील लवकरच अलिबागकर होणार असून अलिबागेत जागा आणि रो हाऊस खरेदी करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. अलिबाग तालुका हा निसर्गाने नटलेला असल्याने अनेकांना त्याच्या सौंदर्याची भुरळ पडत असते. राजकीय नेते, अभिनेते, उद्योजक, सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्टीत व्यक्ती हे अलिबागकर झाले आहेत.

क्रिकेट जगतातील महान खेळाडू यांनीही अलिबागमध्ये जागा घेतलेली आहे. अलिबागच्या या सौंदर्याची भुरळ ही रोहित शर्मा यालाही पडली आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी क्रिकेटर रोहित शर्मा याने अलिबाग सारळ येथे 4 एकर जागा खरेदी केली आहे. रोहितने 9 कोटी रुपये या जागेसाठी दिले असून आज अलिबाग दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत रजिस्टर केले. जागतिक कीर्तीचे क्रिकेटर हे आता अलिबागकर झाले असल्याने अलिबागचे नाव अजून उंचावले आहे.

Exit mobile version