रोहित शर्माची मोठी झेप

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये भारत आणि श्रीलंकेच्या सलामीवीरांना मोठा फायदा झाल्याचे दिसून आले आहे. भारत आणि श्रीलंका संघात नुकतीच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात वनडे मालिका झाली. या मालिकेत रोहित शर्माने 3 सामन्यांत 157 धावा केल्या. तर, श्रीलंकेचा सलामीवीर पाथम निसंकाने 101 धावा केल्या. यामुळे रोहित आता त्याचा साथीदार शुभमन गिलला मागे टाकत 765 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. गिल 763 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय विराट कोहली 746 गुणांसह चौथ्या क्रमांकावर कायम आहे. या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर पाकिस्तानचा बाबर आझम 824 गुणांसह कायम आहे. पण आता त्याला रोहित आणि गिल यांच्याकडून कडवी टक्कर मिळू शकते.

Exit mobile version