| मुंबई | वृत्तसंस्था |
2024 च्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाला 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली होती. बीसीसीआयने ही बक्षीस रक्कम खेळाडू, सपोर्ट स्टाफ, प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांसह 42 सदस्यांमध्ये वाटली. ज्यामध्ये सर्वात मोठा भाग टी-20 विश्वचषकातील 15 सदस्यीय संघाचा आहे. बक्षीस रकमेपैकी सर्व 15 खेळाडूंना प्रत्येकी 5 कोटी रुपये मिळतील. याशिवाय टी-20 विश्वचषकातील मुख्य प्रशिक्षक राहिलेले राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांना प्रत्येकी 2.5 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार आहे. यापूर्वी राहुल द्रविडल यांना 5 कोटी रुपये मिळणार होते, परंतु त्यांना त्यांच्या उर्वरित प्रशिक्षक स्टाफप्रमाणेच बक्षिसाची रक्कम हवी आहे, त्यामुळे त्यांनी 5 कोटी रुपयांपैकी निम्मी म्हणजे 2.5 कोटी रुपये सोडून देण्याचा निर्णय घेतला होता. आणि राखीव खेळाडूंना 1 कोटी रुपये मिळाले आहेत.
पण जेव्हा ही बक्षिसाची रक्कम वाटली जात होती, तेव्हा रोहित शर्माने असे काही केले जे सर्वांची मन जिंकेल. यावेळी भारतीय संघाच्या एका सपोर्ट स्टाफ सदस्याने खुलासा केला आहे की, जेव्हा 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम वाटली गेली तेव्हा रोहित शर्माने आवाज उठवला आणि सपोर्ट स्टाफला एवढी कमी रक्कम मिळू नये असे सांगितले. यासाठी तो आपला बोनस देण्यासही तयार होता.