| मुंबई | वार्ताहर |
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात फक्त सात धावा करुन बाद झाला. यासोबतच त्याच्या नावे लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. गेल्या पाच सामन्यांमध्ये रोहित शर्मा एक अंकी धावसंख्येवर बाद झाला आहे. यासोबतच रोहित शर्माच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित शर्माला त्याच्या नावाला साजेशी अशी खेळी करता आलेली नाही. अनेक वेळा रोहित 10 हून कमी धावा करून तंबूत परतला आहे. ही त्याच्या कारकिर्दीतील पहिलीच वेळ आहे.