| मुंबई | वृत्तसंस्था |
आयपीएल 2024 च्या 29 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने होते. चेन्नईनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 206 धावा ठोकल्या. 207 धावांचं मोठं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईनं फलंदाजीला आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्मानं सुरुवातीपासूनच आपले इरादे स्पष्ट केले. त्यानं सीएसकेच्या गोलंदाजांना एकापाठोपाठ एक मोठे फटके हाणायला सुरुवात केली. रोहित शर्मानं चेन्नई विरुद्धच्या खेळीत 3 षटकार लगावताच इतिहास रचला. तो टी क्रिकेटमध्ये 500 षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे.रोहित शर्मानं टी 20 मध्ये 500 षटकार पूर्ण केले आहेत. अशी कामगिरी करणारा तो जागतिक क्रिकेटमधील पाचवा फलंदाज ठरला. त्याच्या आधी ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, आंद्रे रसेल आणि कॉलिन मुनरो यांनी टी 20 क्रिकेटमध्ये 500 किंवा त्याहून अधिक षटकार मारले आहेत. आता या यादीत रोहित शर्माचाही समावेश झाला आहे.