रोहितचे इंझमामला प्रत्युत्तर

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारतीय संघ टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिली आहे. दरम्यान, पाकिस्तानी टीव्हीवर बसून माजी क्रिकेटपटू इंझमाम उल हकने भारतीय संघावर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला होता. इंझमाम म्हणाला होता की, अर्शदीप सिंगला डावाच्या 15व्या षटकात स्विंग मिळत होता. हे माझ्यासाठी आश्‍चर्यकारक होते. याचा अर्थ 12व्या आणि 13व्या षटकापर्यंत चेंडू स्विंगसाठी तयार होता. भारताने चेंडूशी छेडछाड केली की नाही हे पंचांनी तपासावे. यावर भारतीय कर्णधाराने आपल्या शैलीत इंझमामला प्रत्युत्तर दिले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्याच्या आधी जेव्हा रोहितला इंझमामच्या आरोपाबद्दल विचारण्यात आले. तेव्हा त्याने पाकिस्तानच्या माजी फलंदाजाला मन मोकळे ठेवण्याचा सल्ला दिला. रोहित म्हणाला की, यावर मी तुम्हाला काय उत्तर देऊ? जर तुम्ही दिवसभरात इथल्या परिस्थितीत सामना खेळलात तर खेळपट्टी खूप कोरडी असते त्यामुळे चेंडू आपोआप रिव्हर्स स्विंग होतो. चेंडू फक्त आमचाच नाही तर सर्व संघ खेळत असतानाही रिव्हर्स होते. कधी कधी डोकं वापरणंही गरजेचे असते. विश्‍वचषक कुठे खेळवला जात आहे हेही बघावं लागेल.

Exit mobile version