रोना विल्ससनने केली अंतरिम जामीनाची मागणी

। मुंबई । वृत्तसंस्था ।
भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी असलेल्या रोना विल्ससनने अंतरिम जामिनासाठी एनआयएच्या विशेष न्यायालायत याचिका दाखल केली आहे. वडिलांच्या निधनानंतर 30 दिवसांनी कुटुंबीयांनी आयोजित केल्या शोकसभेला उपस्थित राहण्याासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. भीमा प्रकरणात कथिद सहभागाप्रकरणी रोना विल्सनला जून 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. सध्या त्याला नवी मुंबईतील तलोजा तुरुंगात ठेवण्यात आले आहे. रोना विल्सनने वकील आर सत्यनारायण आणि नीरज यादव यांच्या माध्यमातून न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मानवी मूल्यांचा विचार करून जामीनासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. कुटुंबातील सदस्यांना भेटण्याची आणि शोकसभेत सहभागी होण्याची विनंती करण्यात आली आहे.

Exit mobile version