। पनवेल । वार्ताहर ।
आगामी लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी मंगळवारी (दि.2) कळंबोली शहरात नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या नेतृत्वाखाली संचलन करण्यात आले.
कळंबोली पोलिस ठाण्यातून काढण्यात आलेल्या या संचलनामध्ये 12 अधिकारी 79 अंमलदार सहभागी झाले होते. त्यामध्ये आरपीएफ जवान, पोलिस अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी कळंबोली पोलिस ठाणे हद्दीतील महत्त्वाची मतदान केंद्रे, संवेदनशील परिसर, संमिश्र वस्ती तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या ठिकाणी संचलन करण्यात आले.