। रेवदंडा । प्रतिनिधी ।
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून रेवदंडा पोलिसांचा जोरदार रूट मार्च पहाण्यास मिळाला. रेवदंडा बाजारपेठ ते चौल नाका अशा रूट मार्चचे आयोजन रेवदंडा पोलिसांनी केले. रेवदंडा बाजारपेठ, रेवदंडा हायस्कूल, चौल रामेश्वर, चौल नाका आदी ठिकाणी ग्रामस्थांना रेवदंडा पोलिसांचे रूट मार्च याची डोळा पहाण्याचा योग प्राप्त झाला.
प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरिक्षक श्रीकांत किरविले यांच्या नेतृत्वाखाली रेवदंडा पोलिसांच्या रूट मार्चला सकाळी दहा वाजता प्रारंभ झाला. या रूट मार्चमध्ये सीआयएसएफ जवान, आरसीपी जवान, स्थानिक पोलीस, पोलीस अधिकारी उपनिरिक्षक नंदगावे, गांगुर्डे, सर्व अमंलदार यांनी सहभाग घेतला. रेवदंडा पोलीस ठाणे येथून प्रारंभ झालेल्या रूट मार्च संकल्पसिध्दी सितारा स्टँड, गोळा स्टॉप, पारनाका, रेवदंडा बाजारपेठ, रेवदंडा हायस्कूल, चौल रामेश्वर, चौल नाका व बायपासमार्गे पुनस्यः रेवदंडा पोलीस ठाणे असे मार्गक्रमण रेवदंडा पोलिसांच्या रूट मार्चचे होते.