रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा दणदणीत विजय

। मुंबई । वृत्तसंस्था ।
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील तिसरा सामना चांगलाच रोमांचकारी ठऱला. या तिसर्‍या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यात जोरदार लढत झाली. बंगळुरुने 206 धावांचे उभे केलेले आव्हान पंजाबने स्वीकारून आजचा सामना खिशात घातला. पहिल्याच सामन्यात पंजाबने पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला. पंजाबसमोर 206 धावांचे तगडे आव्हान उभे करण्यासाठी बंगळुरुचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने मोठी भूमिका बजावली. त्याने 56 चेंडूंमध्ये 7 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 88 धावा केल्या. मात्र शेवटी बंगळुरुला पराभवाचा सामना करावा लागला.
बंगळुरुने दिलेल्या 206 धावांचे लक्ष्या गाठताना पंजाबच्या राज बाजवा वगळता सर्वच फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. सलामीला आलेला कर्णधार मयंक अग्रवालने सुरुवातीला चांगले फटके मारण्याचा प्रयत्न केला. दोन षटकार आणि दोन चौकार यांच्या मदतीने अग्रवालने 24 चेंडूंमध्ये 32 धावा केल्या. तर अग्रवालसोबत सलामीला आलेल्या शिखर धवनने तुलनेने चांगला खेळ करत 29 चेंडूंमध्ये पाच षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने संघासाठी 43 धावा केल्या. हर्षल पटेलने फेकलेल्या चेंडूंवर झेलबाद झाल्यामुळे त्याचे अर्धशतक हुकले. तर अशीच स्थिती भानुका राजपक्षे याची झाली. त्याने 22 चेंडूंमध्ये चार षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 43 धावा केल्या. त्यानंतर मात्र लिव्हिंगस्टोन आणि राज बावा यांनी निराशा केली. लिव्हिंगस्टोनने 10 चेंडूमध्ये 19 धावा केल्या. तर राज बावा खातंदेखील उघडू शकला नाही. मोहम्मद सिराजने फेकलेल्या चेंडूवर तो पायचित झाला. मात्र त्यानंतर शाहरुख खान आणि ओडेन स्मिथ यांनी अनुक्रमे 24 आणि 25 धावा करत संघाला विजयापर्यंत नेलं. शेवटी दोघेही नाबाद राहिले.

Exit mobile version