खाद्यतेलाच्या किंमतीत प्रतिकिलो २० रुपयांची वाढ; सर्वसामान्यांना झळ

। मुंबई । वृत्तसंस्था ।
रशिया-युक्रेनच्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. युद्धाच्या खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये प्रतिकिलो वीस रुपयांची वाढ झाली असून आता या युद्धाची झळ सर्वसामान्यांनाही बसणार आहे. खाद्यतेलाच्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांनतरही ही भाववाढ झाली आहे.
रशिया युक्रेनमुळे सुर्यफूल तेलाची घटलेली आयात, सर्व पुरवठादार देशांकडून अपुरा पुरवठा, देशांतर्गत सोयाबीनचं कमी उत्पादन यामुळे ही खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये ही भाववाढ झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम देशातील खाद्यतेलाच्या आयातीवर झाला आहे. या दोन्ही देशांतून भारत सूर्यफूल तेलाची मोठ्या प्रमामात आयात करतो. परंतु युद्धामुळे सर्व बंदरे बंद असल्यामुळे या सूर्यफूल तेलाच्या आयात करण्यात अडचणी आहेत. याशिवाय इतर देशांकडून पामतेलाचा पुरवठा होत नाही. ब्राझील, अर्जेंटिना यांसारख्या पामतेल पुरवठादार देशांनीही पुरवठा कमी केला आहे.
याशिवाय मोहरी तेल भारतीय बाजारपेठेत अजून दाखल झालेले नाही आणि झाले तरी त्याचा वापर भारतातील खूप मर्यादित भागात होतो. याशिवाय देशांतर्गत सोयाबीनचे उत्पादनही यंदा कमी झाले आहे. त्याचेही परिणाम खाद्यतेलाच्या किंमतीवर झाले आहेत.

Exit mobile version