आरटीसीए, टॅक्स कन्सल्टंट्सची संवाद बैठक

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबागमध्ये दि. 17 एप्रिल रोजी अलिबाग येथे आरटीसीए आणि स्थानिक टॅक्स कन्सल्टंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत व्यवसायातील अडचणी, त्यावरील उपाययोजना तसेच व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक दिशा यावर सखोल चर्चा करण्यात आली. या संवाद बैठकीला अलिबागमधील व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, सुमारे 40 ते 50 टॅक्स कन्सल्टंट्स व व्यावसायिक सहभागी झाले होते. ज्येष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांचे ज्ञानवर्धन, आर्थिक प्रगती आणि उत्तम आरोग्य यासाठी आरटीसीएतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा संस्थेचे सचिव कौस्तुभ जोशी यांनी मांडला. आरटीसीएचे उद्दिष्ट आणि ध्येय हे सभासदांच्या गरजांशी सुसंगत असल्याचे मत उपाध्यक्ष राजेश जगे यांनी व्यक्त केले. तर भविष्यात अलिबागला “ज्ञानाचा अभेद्य किल्ला” बनविण्याचा संकल्प अध्यक्ष जनार्दन तांडेल यांनी व्यक्त केला. सभासद, विद्यार्थी आणि व्यावसायिकांच्या ज्ञानवृद्धीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले. आगामी काळात असे उपक्रम राबविताना अलिबागकरांचा सक्रिय सहभाग राहील, अशी ग्वाही जिल्हा समन्वयक संजय राऊत यांनी दिली. कार्यक्रमासाठी बैठक व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल आदर्श पतसंस्था, अलिबाग यांचे आभार संस्थेचे खजिनदार किरण पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अलिबाग तालुका समन्वयक स्वाती धर्माधिकारी, श्वेता घरत, वैभव जोशी आणि प्रणय नाईक यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version