जिल्ह्याच्या खो-खो संघात रुचिता, साक्षी, सानिकाची निवड

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनची सन 2022-23 ची 25 वी कुमार मुली गटाची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी खो-खो स्पर्धा रोहा तालुका खो-खो असोसिएशन तालुका रोहा यांच्या यजमानपदाखाली आयोजित करण्यात आली होती. 48 व्या कुमार मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत सहभागी होणार्‍या खेळाडूची रायगड जिल्ह्याच्या प्रातिनिधीक संघात निवडीबाबत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत सुधागड तालुक्यातील नांदगाव विद्यालयातील कुमार मुली गटातील खो-खो संघाने सहभाग घेऊन अंतिम चार संघात आपले स्थान निश्‍चित केले. या संघातून रुचिता मोहने, साक्षी खैरे, सानिका ठकोरे या कुमार गटातील मुलींची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड झाली. या निवड झालेल्या कुमार गटातील मुलींची तसेच त्यांचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक संभाजी ढोपे, नागेश सायगावकर, जयश्री अहिरराव यांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश खैरे यांनी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version