रग्बी फुटबॉल निवड चाचणी शिबीर

। नेरळ । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा रग्बी फुटबॉल संघाची निवड करण्यासाठी चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नेरळ विद्या मंदिर मंडळाच्या शैक्षणिक संस्थेत आयोजित केलेल्या या शिबिरात जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयीन फुटबॉलपटू आणि रग्बी खेळाडू यांचा सहभाग होता. नेरळ विद्या मंदिर येथील मैदानावर रायगड जिल्हा रग्बी असोसिएशन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रग्बी फुटबॉल शिबिराचे आणि जिल्हा निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन विद्या मंदिर मंडळ कोषाध्यक्ष विवेक पोतदार यांचे हस्ते आणि प्रा.पी.बी.विचवे, रायगड जिल्हा रग्बी असोसिएशन सचिव केशव पवार, उपाध्यक्ष सागर शेळके, नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, क्रीडा शिक्षक आणि असोसिएशनचे पदाधिकारी जयवंत पारधी, नितीन सुपे, धनश्री कानडे उपस्थित होते. या शिबिरात 60 खेळाडूंचा सहभाग होता. खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय प्रशिक्षक आले होते. हे शिबीर जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आले होते.

Exit mobile version