रुक्षन भोसलेला मदतीचा हात पुढे

। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड व्यापारी सोसिएशनमध्ये 200 व्यापारी सदस्य आहेत.50 वर्ष जुनी हि संस्था सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असते. त्याचे एक उदाहरण म्हणजे भांडारवाडा येथे राहणार रुक्षन भोसले हमालीचे काम करत असताना अचानक कपाट अंगावर पडल्याने पायाला मोठी दुखापत झाली. ते अनेक दिवस घरी झोपून आहेत. घरात कमावणार कोणी नसल्याने तसेच भोसले व्यापारी संघटनेचा भाग असल्याने त्याला असोसिएशनतर्फे आर्थिक मदत म्हणून 30 हजार देण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन आंबुर्ले, संदीप पाटील, सुरेश जैन, अशोक धुमाळ, पिंटू शहा, महेश भगत, भावेश शहा, सागर चौलकर,उपस्थित होते

Exit mobile version