धावपटू दुती चंदचं आव्हान संपुष्टात

| टोक्यो | वृत्तसंस्था |
भारतीय धावपटू दुती चंदचं ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. दुती 200 मीटर हीट 4 प्रकारात सातव्या क्रमांकावर राहिली. यामुळं दुतीच्या सेमिफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. तिनं हीट 4 मध्ये 23.85 सेकंद एवढा वेळ घेतला. दुतीचा या प्रकारात व्यक्तिगत बेस्ट 23.00 सेकंदांचा आहे.

दुतीने 23.85 च्या हंगामातील सर्वोत्तम वेळेसह 200 मीटर अंतर पार केले खरे; पण ती सातव्या स्थानावर राहिली. यामुळं ती उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्यात अयशस्वी झाली. क्रिस्टीन एमबोमाने 22.11 वेळेसह हीट 4 मध्ये अव्वल स्थान मिळवले, तर अमेरिकेची गॅब्रिएल थॉमस 22.20 च्या वेळेसह दुसर्‍या स्थानावर राहिली. दुती चंद महिलांच्या 100 मीटर स्पर्धेच्या उपांत्य फेरी गाठण्यातही अपयशी ठरली होती. हिट 5 मध्ये दुतीनं 11.54 सेकंदांचा वेळ घेतला होता. ती या प्रकारात सातव्या स्थानावर होती.

Exit mobile version