। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंध असल्यामुळे रुपाली चाकणकर यांना अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले. अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आल्यानंतर गेल्या दोन दिवसांमध्ये रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विविध पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केली होती. अखेर शुक्रवारी (दि.20) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.







