| मुंबई | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने मागील सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करुन नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली पाटील-चाकणकर यांच्यावर रुपाली ठोंबरे-पाटील यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांना पक्षाने नोटीस पाठवली होती. त्यामुळे ठोंबरे यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. तसेच, अमोल मिटकरी यांचीही प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी झालेली आहे. मिटकरी यांच्या वादग्रस्त विधानांमुळे महायुतीमध्ये बेबनाव निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 10 नोव्हेंबर रोजी एक पत्र काढून नवीन प्रवक्त्यांची नावे जाहीर केलेली आहेत. या नियुक्त्यांव्यतिरिक्त यापूर्वी केलेल्या सर्व नियुक्त्या पक्षाने रद्द केल्या आहेत. दरम्यान, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी फलटण येथील युवती डॉक्टर आत्महत्या प्रकरणात डॉक्टरचे चारित्र्यहनन केल्याचा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला होता. यासह त्यांनी चाकणकरांवर इतरही गंभीर आरोप केले होते. त्यामुळे त्यांच्यावर पक्ष कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तोफ म्हणून ओळख असलेले अमोल मिटकरी यांनाही प्रवक्ते पदावरुन दूर करण्यात आलेले आहे. त्यांची सातत्याने महायुतीमधील घटकपक्षांवरील विधाने आणि पक्षातील कुरबुऱ्यांमुळे त्यांना हटवले असल्याचे बोलले जात आहे.
रुपाली ठोंबरे-पाटील यांची हकालपट्टी
