| पाताळगंगा । प्रतिनिधी |
ग्रामीण रुग्णालय चौक नागरिकांच्या सुरक्षतेसाठी एक पाऊल पुढे टाकत विविध उपक्रम राबविण्या येत आहे. लहान मुले, गरोदर महिला वर्ग तसेच विविध आजाराविषयी माहिती मार्गदर्शन केले. तसेच या उपक्रमा अंतर्गत आहाराविषयी माहिती व स्वच्छते बद्दल माहिती देण्यात आली. लहान मुले यांच्या आहाराविषयी माहिती तसेच आरोग्य तपासणी व त्यांचे संगोपन या विषयी मार्गदर्शन केले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सविता कालेल, आर.बी.एस.के चे वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते. शिबिरामध्ये लहान आहार व तसेच तेल, मीठ, खजूर, चणे, केली, बुंदी, लाडू, शेंगदाणे, चिक्की अशा विविध पोस्टीक आरोग्य माहिती देण्यात आली. यावेळी डॉ. सविता कालेल बालरोगतज्ञ यांनी लहान मुलांची तपासणी करण्यात आली. व त्यांना मार्गदर्शन केले. बाल रोग तपासणीमध्ये कुपोषित बालके हृदयरोगाचे बालके विविध त्वचा तसेच संबंधित वैयक्तिक स्वच्छता तसेच पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.