पी.एल.टी एंटरप्रायजेस वांगणी विजेता
| नागोठणे | वार्ताहर |
नागोठणे ग्रामीण विभागातील क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आलेल्या, ग्रामीण प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वांगणी येथील लहू तेलंगे व प्रतिक तेलंगे संघ मालक असलेला पी.एल.टी एंटरप्रायजेस संघाने विजेतेपदाचे रोख 40 हजार रुपये व आकर्षक चषक मिळविला. तर वांगणीचाच एकनाथ ठाकूर यांचा शरयू एंटरप्रायजेस हा संघ 30 हजार रुपये रोख व आकर्षक चषक मिळवून उपविजेता ठरला. विशाल म्हात्रे यांचा दैवी प्रसन्न इलेव्हन, वरवठणे व निश्चय इलेव्हन, पाटणसई हे संघ अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर राहिले.
नागोठण्याजवळील वेलशेत येथील श्री.जाखमाता क्रीडांगणावर दोन दिवस संपन्न झालेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण मनोज खांडेकर, किशोर म्हात्रे, लहू तेलंगे, प्रतिक तेलंगे, एकनाथ ठाकूर, शेखर ठाकूर, प्रल्हाद राणे, प्रमोद जांबेकर, चंद्रकांत भालेकर, विजय जाधव, विशाल म्हात्रे, अंकुश तेलंगे, चंद्रकांत तेलंगे, सुभाष मढवी, मंदार कोतवाल, निलेश साळवी आदींसह अनेक मान्यवर व क्रिकेटप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले.