| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्यातील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या वेलशेत येथील विद्या संकुलातील एस.डी.परमार इंग्लीश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम शनिवारी (दि.9) नागोठण्यातील आराधना भवन येथे उत्साहात झाला. संस्थापक अध्यक्ष किशोर जैन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला संगीता जैन, सुरेश जैन, कार्तिक जैन, रेश्मा जैन, सुप्रिया संजय महाडीक, डॉ. मिलिंद धात्रक, राजीव टेमकर, विजय शहासने, अमृता महाडिक, भाविका गिजे, शबाना मुल्ला, विनिता पाटील, कल्पना टेमकर, राजश्री टेमकर, समीर भिकन, हुसेन पठाण आदींसह अनेक मान्यवरांनी उपस्थित होते.
या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये परमार हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण सुंदर पद्धतीने केले. या कार्यक्रमासाठी पालकवर्ग व नागोठणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी मेहनत घेतली होती.