| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, माजी परराष्ट्रमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस.एम. कृष्णा यांचे मंगळवारी (दि. 10) पहाटे 2.45 वाजता बंगळुरू येथील राहत्या घरी निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. ते 1999 ते 2004 पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि 2004 ते 2008 पर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल होते. दीर्घकाळ काँग्रेसमध्ये राहिलेले एमएम कृष्णा नंतर भारतीय जनता पक्षात दाखल झाले. ते काही दिवसांपासून आजारी होते आणि ऑक्टोबरमध्येही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी गेल्या वर्षीच सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली होती.