साची इलेव्हन संघ विजयी

। आवरे । वार्ताहर ।
गोरगरीब, गरजू, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी साई नगर प्रीमिअर लीग व्यवस्थापन कमिटीच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी हा स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. स्पर्धेतील अंतिम सामना जिंकत साची इलेव्हन संघाने चषकावर आपले नाव कोरले. यावेळी संघमालक सूरज पाटील यांनी स्पर्धेच्या माध्यमातून मिळालेला नफा हा गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी असेल, असे जाहीर केले.


या स्पर्धेत हर्ष वॉरिअर्स, साची इलेव्हन, ब्राह्मणदेव इलेव्हन आणि श्रीयंशा इलेव्हन हे संघ सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणतीही अडचण येऊ नये, त्यांना मदतीचा हात मिळावा, या उद्देशाने प्रथमच साई नगर प्रीमिअर लीगचे आयोजन करण्यात आले होते.
तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी साईच्या दरबारापासून ढोल तशांच्या गजरात साई मंदिर ते क्रिकेटचे मैदान अशी सर्व संघ मालक, संघ कर्णधार खेळाडू यांची मिरवणूक काढण्यात आली. स्पर्धेसाठी आवरे ग्रुप ग्रामपंचायत सद्स्य अविनाश गावंड यांनी सर्व चषक दिले, तर रंगीबेरंगी जर्सी या उरण पंचायत समिती सदस्या समिधा निलेश म्हात्रे यांनी दिल्या. या स्पर्धेसाठी सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, सरपंच निरा पाटील, अविनाश गावंड , धनेश गावंड, अलंकार पाटील, अरुण थळी, प्रेमानाथ गावंड, राजेंद्र गावंड, विद्याधर गावंड, अमित म्हात्रे, किसन भोईर, गणेश ठाकूर, महेश गावंड, श्याम गावंड आदींनी हजेरी लावली.
या स्पर्धेत बेस्ट बट्समन प्रज्वल गावंड, बेस्ट गोलंदाज सिद्धेश भगत, मॅन ऑफ सीरिज अजय किल्लेकर, इमर्जिंग बेस्ट अवॉर्ड स्वागत म्हात्रे यांना प्रदान करण्यात आला. समालोचन निवास गावंड, सुधीर ठाकूर, विद्याधर गावंड, सर्वेश गावंड, संकेत गावंड यांनी केल. लेखनिक याच काम सुधीर ठाकूर व प्रितेश गावंड यांनी केलं.

Exit mobile version