। माणगाव । प्रतिनिधी |
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्था मुंबई या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील राष्ट्रीय बाण्याच्या उपक्रमशील संस्थेद्वारे राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरिषद 2021 या उपक्रमांतर्गत माणगावचे ग्रामविकास अधिकारी सचिन सुरेश कुराडे यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार 2021 ने टिळक स्मारक मंदिर पुणे शहर येथे सुप्रसिद्ध विचारवंत लेखक, पत्रकार, कवी व वक्ता श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर यांच्या हस्ते व समारंभाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक रमेश आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबनराव रसाळ इंटरनॅशनल सोशल आयकॉन डॉ.शुभदा जोशी, महापरिषद समन्वयक प्रकाश सावंत, संस्थापक अध्यक्ष कृष्णाजी जगदाळे, समाजसेविका मिनाक्षी गवळी यांच्या विशेष उपस्थितीत गौरविण्यात आले. सदरचा पुरस्कार ग्रामविकास अधिकारी सचिन कुराडे यांनी सहपत्नी स्वीकारला. उपरोक्त संस्थेकडून सचिन कुराडे यांना मनाचा राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
ग्रामविकास अधिकारी सचिन कुराडे पुरस्काराने सन्मानित
