अलिबागचा सचिन पाटील महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग संघाचा प्रशिक्षक

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

पंजाब लुधियाना येथे १४ मिस्टर इंडिया बॉडी बिल्डिग स्पर्धा २३ ते २५ डिसेंबर रोजी होत आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील २० जणांचा चमू पंजाब येथे २२ डिसेंबर रोजी दाखल झाला आहे. महाराष्ट्र चमूचे प्रशिक्षक म्हणून कोंकण बॉडीबिल्डींग अँड फिजिक स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशनचे सरचिटणीस अलिबागचे सचिन पाटील हे करीत आहेत. त्यामुळे अलिबागसह जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.

२३ ते २५ डिसेंबर या कालावधीत पंजाब लुधियाना येथे १४ मिस्टर इंडिया स्पर्धा होणार आहे. इंडीयन बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या माध्यमातून पंजाब अमृतसर बॉडी बिल्डिंग असोसिएशनवतीने ही स्पर्धा आयोजित केली आहे. महाराष्ट्रातून २० जणांचा चमू या स्पर्धेसाठी निवडला आहे. या चमुचे प्रशिक्षक म्हणून अलिबाग वायशेत येथील सचिन पाटील यांच्यावर जबाबदारी दिली आहे. सचिन पाटील यांनी गेल्यावर्षी उझबेकिस्तान येथे झालेल्या स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले होते. अनेक स्पर्धेत सचिन याने यश मिळवून पदके कमवली आहेत.

महाराष्ट्र संघाची प्रशिक्षक जबाबदारी सचिन पाटील याना दिली असून आपल्या अनुभवाचा लाभ खेळाडूंना त्याच्या माध्यमातून मिळणार आहे. या स्पर्धेत २७ राज्यांनी सहभाग घेतला असून ४२ संघ सामील झाले आहेत. सचिन पाटील यांच्या निवडीने त्याच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे.

Exit mobile version