| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी क्रिकेटचा देव आणि भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरची अहमदाबाद येथे 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी ग्लोबल ॲम्बेसेडरपदी म्हणून नियुक्ती केली आहे.
सचिन तेंडुलकरने एकदिवसीय विश्वचषकात सहा वेळा सहभाग घेतला आहे. सचिन पहिल्यांदा 1992 मध्ये विश्वचषक खेळला होता. तो शेवटचा 2011च्या विश्वचषकात दिसला होता, जेव्हा भारतीय संघाने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले होते. गुरुवारी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सलामीच्या सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकर विश्वचषक ट्रॉफीसह मैदानात उतरेल आणि स्पर्धेचे उद्घाटन झाले असे घोषित करेल. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “1987 मध्ये बॉल बॉय बनण्यापासून ते सहा स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंत विश्वचषकाचे माझ्या हृदयात नेहमीच विशेष स्थान राहिले आहे. 2011 मध्ये विश्वचषक जिंकणे हा माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात अभिमानास्पद क्षण होता.