सचिन तेंडुलकरचा पुतळा जाळणार: बच्चू कडू

| अमरावती | वृत्तसंस्था |

प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरवर निशाणा साधला आहे. नुकतेच सचिन तेंडुलकरच्या एका बॉडीगार्डने आत्महत्या केली होती. बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने ऑनलाईन रम्मीच्या व्यसनापोटी आपलं जीवन संपवलं असा दावा केला आहे. याचबरोबर त्यांनी सचिन तेंडुलकरवर ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करत असल्यावरून पुन्हा टीका केली.

जळगावच्या जामनेर येथील घटना. बच्चू कडू म्हणाले की, जो व्यक्ती आयुष्यभर सचिन तेंडुलकरची सुरक्षा करत होता. त्यानं आपले जीवन ऑनलाईन रम्मीमुळं आज संपवलं. याच ऑनलाईन गेमिंगची जाहिरात सचिन तेंडुलकर करतो. हे निषेध करण्यासारखं आणि राग येण्यासारखं आहे. सचिनने ऑनलाईन रम्मीची जाहिरात करणं थांबवावं किंवा त्यानं भारत रत्न परत करावा. जर त्यानं असं केलं नाही तर आम्ही 6 किवा 7 जूनला त्यांच्याविरूद्ध आंदोलन करून त्याच्या पुतळ्याचं दहन करू.

बच्चू कडूने पहिल्यांदाच सचिनविरूद्ध आंदोलन केलेलं नाही. यापूर्वी देखील सचिनने ऑनलाईन रम्मीचं प्रमोशन केल्याचा आरोप करत बच्चू कडूंनी त्यांच्याविरूद्ध आंदोलन केलं होतं. बच्चू कडू पुढे म्हणाले की, मसचिनची कायम सुरक्षा करणारा बॉडीगार्डने सचिन जाहिरात करत असलेल्या ऑनलाईन रम्मीपोटी आपला जीव गमावला. जर अशा प्रतिष्ठित व्यक्तींनी केलेल्या जाहिरीतामुळं अशी दुःखत घटना घडत असेल तर हे देशाचं दुर्दैवच आहे. सचिन तेंडुलकरचा बॉडीगार्ड प्रकाश कापडे हे राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी होते. त्यांनी जामनेर येथील आपल्या राहत्या घरी 15 मे रोजी स्वतःवर गोळी झाडून घेत आपलं जीवन संपवलं होतं. त्यांनी एसआरपीएफमध्ये 15 वर्षे काम केलं. ते यापूर्वी छगन भुजबळ आणि नारायण राणे यांच्या सुरक्षेत तैनात होते. त्यानंतर ते सचिन तेंडुलकरच्या मुंबईतील घराच्या सुरक्षेत तैनात होते. पोलिसांनी प्रकाश कापडे यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

Exit mobile version