सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा रक्षकाची आत्महत्या

| जळगाव | वृत्तसंस्था |

जळगाव जामनेर येथे सुटी घेऊन घरी आलेल्या सीआरपीएफ जवानाने बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ही घटना जामनेर येथे मंगळवारी (दि.14) रात्री घडली आहे. प्रकाश गोविंदा कापडे (३७, रा. गणपती नगर, जामनेर) असे मृत जवानाचे नाव आहे.

यापूर्वी त्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री छगन भुजबळ व क्रिकेट खेळाडू सचिन तेडुलकर यांच्याकडे अंगरक्षक म्हणून काम केले आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहिण असा परिवार आहे. कापडे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या कापडे हे सचिन तेंडुलकरच्या घरी सुरक्षा रक्षकाचे काम करत होते. गेल्या आठ दिवसांपासून ते गावी आले होते. आज पहाटे त्यांनी आत्महत्या केली. याची खबर पसरताच लोकांनी त्यांच्या घराजवळ गर्दी केली आहे. पुढील पोलीस तपास करत आहेत.

Exit mobile version