| पनवेल | वार्ताहर |
तूरडाळीचा भुसा भरलेल्या गोणी रस्त्यावर पडल्याची घटना पनवेल-जेएनपीटी महामार्गावर घडली. पळस्पेकडून जेएनपीटीकडे जाणार्या ट्रकमुळे झालेली वाहतूककोंडी वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे दूर झाली आहे. पळस्पेकडून जेएनपीटीकडे जाणारा ट्रक क्रमांक आर.जे. 11-जे.बी. 8182 यामध्ये तुरडाळीचा भुसा भरलेल्या गोणी होत्या. त्यातील काही गोणी रस्त्यावर पडल्याने काही काळासाठी या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. याबाबतची माहिती वाहतूक शाखेला मिळताच पोलीस हवालदार भोईर, पोलीस नाईक पाटील, पोलीस नाईक ढेंबरे, पोलीस शिपाई भोरे, पोलीस शिपाई घोडे आदींचे पथक घटनास्थळी त्वरित पोहचले व त्यांनी सदरचा ट्र्क तसेच, रस्त्यावर पडलेल्या गोण्या एका बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.





