| अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील नवखार येथील साधना बाळाराम तेलगे यांचे मंगळवारी (दि.5) निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 65 वर्षे होते. त्या सुडकोली ग्राम पंचायतीच्या माजी सदस्या, तसेच शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्त्या होत्या. शेतकरी कामगार पक्षाच्या माहिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी तेलगे कुटूंबियाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांच्या पार्थिवावर नवखार येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी, ग्रामस्थ, व नातेवाईक उपस्थित होते. यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी रविवारी (दि.17) होणार असल्याची माहिती तेलगे कुटूंबियांकडून देण्यात आली आहे.







