“सखी” कडून “ती” ची सुरक्षित पाठवणी

| अलिबाग | वार्ताहर |
पतीकडून सातत्याने शारीरिक व मानसिक त्रास देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार सखी वन स्टॉप सेंटर अलिबागच्या मदतीने उजेडात आला. पीडित महिलेला पतीकडून दररोज मारहाण करण्यात येत असल्याची तक्रार या महिलेने सखी सेंटरकडे केली होती. ही पीडित महिला एका मुलाची आई असून, तीन महिन्याची गरोदर आहे. ङ्गसखीफच्या माध्यमातून पतीच्या अत्याचारातून तिची मुक्तता करण्यात आली असून, तिला तिच्या माहेरी तामिळनाडू येथे सुखरुप पाठविण्यात आले आहे.

दि. 2 ऑगस्ट रोजी फोनद्वारे पतीकडून पीडितेवर होणार्‍या शारीरिक व मानसिक त्रासाविषयी माहिती सखी वन स्टॉप सेंटर पुडुुकोट्टई यांच्याकडून सखी वन स्टॉप सेंटर रायगड-अलिबाग यांना प्राप्त झाली. ही पीडित महिला सध्या प्लॉट नं. 101 माँगो होम अपार्टमेंट विष्णूनगर, ता. पेण, जि. रायगड येथे राहात होती. मिळालेल्या माहितीनुसार, सखी वन स्टॉप सेंटर रायगड अलिबाग केंद्राने तात्काळ या पीडित महिलेशी फोनद्वारे संपर्क साधला. पीडिता ही घाबरलेल्या अवस्थेत होती. तिला शांत करण्यात आले व पीडितेची संपूर्ण माहिती घेण्यात आली. तसेच पीडितेस सखी वन स्टॉप सेंटरमार्फत सर्व प्रकाराची मदत करण्यात येईल, अशी खात्री देऊन दि. 3 ऑगस्ट रोजी पीडितेची प्रत्यक्षात भेट घेऊन अत्याचाराबाबत माहिती घेण्यात आली. पीडितेस तिच्या पतीकडून मारहाण व शिवीगाळ होत असल्याचे निदर्शनास आले. सद्यःस्थितीत पीडितेस एक वर्षाचा एक मुलगा आहे व ती तीन महिन्यांची गरोदर आहे. पीडितेला पतीकडे राहायचे नसून, माहेरी तामिळनाडू या मूळ गावी परत जायचे होते. सर्व हकीकत समजून घेतल्यानंतर दि. 4 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजताचे तिरुािारपााी या रेल्वे गाडीचे तिकीट काढून देण्यात आले. व त्यानुसार या पीडितेस वन स्टॉप सेंटर रायगड अिाबाग येथील कर्मचार्‍यांनी पेण येथून कुर्ला रेल्वे स्थानक येथे बसने घेऊन गेले व त्यानंतर तेथून तिरुािारपााी या रेल्वे गाडीत बसविण्यात आले व पीडितेस तिच्या माहेरी पाठविण्यात आले व पीडितेची पतिच्या अत्याचारापासून सुटका करण्यात आली.
सखीच्या सुविधा

Exit mobile version