। म्हसळा । वार्ताहर ।
ऑलिंपिकच्या धर्तीवर अल्मोरा भारतातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा हेमवतीनंदन बहुगुणा स्टेडियम उत्तराखंड येथे सुरू आहेत. या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आर्टिस्टिक योगासन ग्रुप प्रकारात महाराष्ट्र संघाला 109 गुणांनी कांस्यपदक प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राच्या या संघात म्हसळा तालुक्यातील खरसई गावचे सुपुत्र तथा गुरुकुल आरोग्य योगपिठ खरसईचा योग साधक सागर शितकर याने उच्च प्रदर्शन करून संघाला पदक प्राप्त करण्यास मोलाचा वाटा उचलला. या यशाबद्दल सागर शितकरचे चंद्रकांत खोत, उत्तम मांदारे, हेमंत पयेर, रघुनाथ शितकर, निलेश मांदाडकर, परशूराम मांदाडकर, महादेव नाक्ती, कोमल वेटकोळी, परशूराम माळी, पांडुरंग खोत, रामचंद्र मांदारे, दत्ताराम पयेर, काशिनाथ कोकाटे आदी मान्यवर यांनी केले आहे.
सागर शितकरला योगासनात कांस्यपदक
