| उरण | प्रतिनिधी |
वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे येथील बीएमएस शाखेचा विद्यार्थी साहिल सुनील ठाकूर याने शैक्षणिक वर्ष 2023-24 झालेल्या पदवी परीक्षेत शेवटच्या सहामाही परीक्षेत 10 ग्रेस गुणांकन मिळवून बीएमएस पदवी शाखेत महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकवला. त्याच्या या यशाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रचंड जिद्द व मेहनत, अभ्यासू व्यक्तिमत्व असलेला साहिल प्राथमिक शिक्षण घेत असल्यापासून नेहमीच चांगल्या गुणांनी पुढे जात होता. महाविद्यालयातील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व अविरत अभ्यास करून त्याने हे यश संपादित करून त्याने आपल्या गावाचे व घराण्याचे नाव उंचावले. याबद्दल त्याचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तीकडून अभिनंदन केले जात आहे.