साई भंडारा उत्साहात

| पनवेल | प्रतिनिधि |

पनवेलमध्ये ओम साई मित्र मंडळाच्यावतीने लक्ष्मी वसाहत, सोसायटी नाका येथे साई भंडारा 2023 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवळपास दोन ते अडीच हजार साई भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी धार्मिक व सामाजिक उपक्रमांचेही आयोजन यावेळी करण्यात आले होते. दिवसभरातील सर्व कार्यक्रमांना राजकिय, सामाजिक आदी व्यक्तींनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, सुदाम पाटील, अभिजित पाटील, प्रीतम म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version