रत्नागिरी कबड्डी स्पर्धेत साई स्पोर्ट रायगडला तृतीय क्रमांक

| पाली | गोमाशी |

वीरशैव लिंगायत समाज पाली आणि श्री लक्ष्मीपल्लीनाथ स्पोर्ट्स क्लब पाली आयोजित जगत ज्योती महात्मा बसवेश्‍वर महाराज जयंतीनिमित्त वीरशैव लिंगायत समाज मर्यादित भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन रत्नागिरी येथे करण्यात आले होते.

स्पर्धेत कोकणातील लिंगायत समाजातील 16 संघांना निमंत्रित करण्यात आले होते.या स्पर्धेतील अंतिम लढत कालभैरव पंचनदी विरुद्ध जय हनुमान सोमेश्‍वर या दोन संघात झाली.मात्र या स्पर्धेत कालभैरव पंचनदी हा संघ विजयी झाला. या संघास रोख रक्कम 11 हजार111 रु व आकर्षक चषक,तर उपविजेता पदाचा मानकरी जय हनुमान सोमेश्‍वर या संघास रोख रक्कम 7 हजार 777 रु व आकर्षक चषक,तृतीय क्रमांक साई स्पोर्ट रायगड या संघात सुधागड तालुक्यातील गोमाशी येथील लिंगायत समाजातील खेळाडूंने नेतृत्व केले होते. या संघाचे व्यवस्थापक वीरभद्र जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाडूंने आपला बहारदार खेळ करत तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.या संघास आकर्षक चषक देऊन मंडळाच्या वतीने गौरविण्यात आले. स्पर्धेतील सामनावीर चैतन्य, उत्कृष्ट चढाई प्रसन्न आणि उत्कृष्ट पक्कड रोहित जंगम (गोमाशी),उगवता तारा हर्षल महापुंदे(गोमाशी) यांस आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे थेट प्रेक्षपण यु ट्यूब द्वारे करण्यात आले होते.

Exit mobile version