सायराबानू चौगुले साहित्यभूषण पुरस्कार

| माणगाव | वार्ताहर |

माणगाव येथील कवयत्री सायराबानू वजीर चौगुले यांना अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई यांच्यातर्फे आळंदी येथे रविवार दि. 24 डिसेंबर राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्काराने ज्येष्ठ समाजसेवक, कवी, लेखक मधुसूदन घाणेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

संस्थापक शिवाजी किसन खैरे यांच्या अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत सलग तीन वर्षे माणगावच्या कवयत्री चौगुले यांनी काव्यलेखन करून उत्तम कविता सादर केल्या. या साहित्य कलेच्या सन्मानार्थ चौगुले यांना संस्थेच्या न्यायप्रभात राज्यस्तरीय काव्यगौरव सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ समाजसेवक, कवी, लेखक मधुसूदन घाणेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या गौरव पुरस्काराने लोकमान्यतेची साहित्यगौरव मुद्रा चौगुले यांच्या साहित्य कर्तृत्वावर उमटल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळ्यास अक्षरमंच संस्कृती कला अकादमीचे संचालक संस्थापक किसन खैरे, सहसंपादक अनुसया खैरे, ज्येष्ठ साहित्यिक अनंत बोरकर, अलका झरेकर, अडवोकेट विनोद मोल्हार आदी मान्यवर उपस्थित होते. मोठया दिमाखात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातूनच नव्हे परराज्यातूनही साहित्यिक उपस्थित होते. कवयत्री सायराबानू चौगुले यांना राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Exit mobile version