| मुंबई | वृत्तसंस्था |
महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा झाला. गतविजेत्या मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. शेटच्या दोन चेंडूवर मुंबईला विजयासाठी 5 धावांची गरज होती. मात्र, कर्णधार हरमनप्रीत कौर शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बाद झाली. आता खेळपट्टीवर पदार्पण करणारी फलंदाज सजीवन सजना आली होती. मात्र मधील पहिलाच चेंडू खेळणाऱ्या सजीवन सजनाने षटकार मारत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यामुळे दिल्लीच्या तोंडचा घास हिरावला गेला.
दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 विकेट्स गमावून 171 धावा केल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरात मुंबईने दमदार सुरूवात केली. मुंबई इंडियन्स हा सामना आरामात जिंकणार असे वाटत असतानाच दिल्लीने मुंबईच्या फलंदाजीला वेसन घालण्यास सुरूवात केली. अखेर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता. मुंबईला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावांची गरज होती. त्यावेळी क्रीजवर पदार्पणाचा सामना खेळणारी सजना स्ट्राईकवर होती. तिने शेवटच्या चेंडूवर षटकार मारत मुंबईला हंगामातील पहिला रोमहर्षक विजय मिळवून दिला.






