महिला बचत गटांसाठी सखी वन स्टॉप सेंटरचा उपक्रम

। अलिबाग । वार्ताहर ।
14 सप्टेंबर रोजी मंगळवारी सखी वन स्टॉप सेंटर रायगडतर्फे पेण तालुक्यातील कोपर ग्रामपंचायतीतील महिला बचत गटांना सखी वन स्टॉप सेंटर मार्फत जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमास कोपर ग्रामपंचायत उपसरपंच भारती म्हात्रे, बचत गट महिला अध्यक्षा अहिल्याबाई म्हात्रे, पनवेल पोलीस स्टेशन पोलीस नाईक जान्हवी म्हात्रे व बचत गटातील महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात सखी वन स्टॉप सेंटर मार्फत देण्यात येणार्‍या समुपदेशन, कायदेशीर सहाय, वैद्यकीय सेवा, संकटकाळातील प्रतिसाद, निवासी व्यवस्था, संकटमुक्तीची सेवा, बालसंगोपन योजना, मनोधैर्य योजना व इतर शसकीय योजना या सुविधांची सविस्तर माहीती सखी वन स्टॉप सेंटरच्या कर्मचारी सारिका पाटील यांनी दिली. तसेच त्याविषयक माहीती पत्रकही देण्यात आले. तसेच महिलांना कोणतीही समस्या असल्यास त्यांनी सखी वन स्टॉप सेंटर 02141-228560 या दुरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन सखी वन स्टॉप सेंटरकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version