| पनवेल | ग्रामीण प्रतिनिधी |
कंटेनर फ्रेट स्टेशन क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखालील न्यू मॅरीटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटनेच्या पुढाकारातून ओल्ड मर्स्क कंपनीतील कामगारांच्या वेतनवाढीचा महत्त्वपूर्ण करार नुकताच करण्यात आला. हा करार 11 मार्च रोजी जे.एन.पी.टी. परिसरात पार पडला असून या करारानुसार कामगारांना तब्बल 18 हजार रुपयांची पगारवाढ देण्याचे मान्य करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या कामगार धोरणांमध्ये सातत्याने बदल होत असताना कामगारांची नोकरी सुरक्षित ठेवणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी कामगार नेते महेंद्र घरत हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. कंपनी आणि कामगार यांच्यात समतोल राखत हा करार यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या करारानुसार कामगारांना पुढील आठ वर्षांसाठी 18 हजार रुपयांची वेतनवाढ मिळणार आहे.






