| मुंबई | वृत्तसंस्था |
27 वर्षीय व्यवसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणांना अटक केली. डिसेंबरमध्ये वाकोला पोलिसांनी दोन व्यापाऱ्यांविरोधात 77 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. वाहनाची विक्री करताना फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. हे वाहन महाराष्ट्रातील बँकाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले होते, ज्यामुळे पीडित अंगद सेठीला फसवणुकीचा अनुभव आला होता.
डिसेंबरमध्ये दोन व्यावसायिकांवर मुंबईतील वाकोला पोलिसांनी हेवी-ड्युटी बांधकाम वाहन विकून 77 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अंगद सेठी याने जुलै 2023 मध्ये फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. कंपनीकडून 77 लाख रुपयांत वाहन खरेदी केले. पण खरेदीमध्ये फसवणूक झाल्याचे नंतर लक्षात आले. 77 लाख रुपये पंकज सिंग यांच्या फर्मला वाहन खरेदी करण्यासाठी हस्तांतरित केले. बांधकाम पाडण्याच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या या वाहनावर कोणतीही थकबाकी नसल्याचे चलन देण्यात आले होते. पण हे वाहन मुंबईमधील गोदामात घेऊन जाताना बँकेच्या वसुली पथकाने जप्त केले. खालापूर टोल प्लाझा येथे हे वाहन बँकेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर काही दिवस याबाबत पटणातील राणीसाल मेटल्स प्रायवेट कंपनीकडे चौकशी केली. पण फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांमध्ये धाव घेतल अन् गुन्हा दाखल केलाय आहे.
सेठींच्या तक्रारीनंतर डिसेंबरमध्ये वाकोला पोलिसांनी पंकज सिंह, सुबीर कुमार साहू आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला. दोन महिने तपास केल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींनी वांद्रे कोर्टात जामीनासाठी अर्ज केला. कोर्टाने दोघांना प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर केला. त्याशिवाय फायनान्स कंपनीची सर्व थकबादी 10 दिवसांमध्ये भरण्याचा आदेश दिला. थकबाकी भरल्यानंतर एनओसी जमा करण्याची सूचनाही दिली.