। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुका नाभिक समाजाच्यावतीने हुतात्मा दिनाचे औचित्य साधत वीर भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या इमारतीत असलेल्या कोतवाल यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे विश्वस्थ नाना महाले, अस्मिता पवार, भारती घाडगे, मनिषा चव्हाण, विजय भोसले, मनोहर जाधव, मनोज शिंदे आदी मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी ज्येष्ठ नेते स्व.प्रभाकर पाटील यांच्या पुतळ्यासही पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.