। पेझारी । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय प्रभाकर नारायण पाटील तथा भाऊ यांची 95 वी जयंती ना.ना. पाटील संकुलामध्ये साजरी करण्यात आली. यावेळी माजी आ. पंडित पाटील, प्रमुख पाहुणे नागेश कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून, भाऊंच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, को.ए.सो. सहमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक गावडे, सुरेश म्हात्रे, यशवंत पाटील, सुरेश खोत, हेमा शेठ, शरद वरसोलकर, के.डी. म्हात्रे, स्वप्निल पाटील, मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे, सदस्य, सुभानराव राणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष, सदस्य, प्रा. कमलाकर फडतरे, डॉ. दिलीप पाटील, संकुलातील सर्व शाखांचे प्रमुख, सर्व सेवक वर्ग, भाऊंचे चाहते स्नेही, शिक्षणप्रेमी नागरिक, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते असा मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
कार्यक्रम प्रसंगी एनसीसी, आरएसपी, गाईड पथकांनी मानवंदना दिली. शाळेच्या संगीत कलापथकाने ईशस्तवन, स्वागतगीत व भाऊंच्या जीवनावर आधारित गौरव गीत सादर केले. यानंतर प्रतिनिधिक स्वरूपामध्ये प्रत्येक विभागातून एक असे रिया थळे, जागृती पाटील अक्षरा जगताप या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. यानंतर प्रमुख पाहुणे नागेश कुलकर्णी यांनी भाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त केला. पुढे विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली पाटील यांनी, तर आभार तुकाराम बर्गे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समाधान भंडारे, संजय डोंगरे, राजेंद्र म्हात्रे, देवेंद्र पाटील, एस.के. पाटील, तृप्ती पिळवणकर, संध्या खरसंबळे, उदय पाटील, सुवर्णा पाटील, सुनिता पाटील, अमोल पाटील, समीर भोईर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
राम-नारायण पत्रकार भवनात स्व. प्रभाकर पाटील यांची जयंती साजरी
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ व प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंचातर्फे राम-नारायण पत्रकार भवनात स्व. प्रभाकर पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी स्व. प्रभाकर पाटील यांच्या प्रतिमेला रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ विधिज्ञ व माजी जिल्हा सरकारी वकील अॅड. गोपाळराव लिमये यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली.
यावेळी सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष सखाराम अण्णा पवार, सचिव नागेश कुळकर्णी, उपाध्यक्ष बळवंत वालेकर, अॅड. गोपाळराव लिमये, मुश्ताक घट्टे, नंदु तळकर, राजा भगत आदींनी स्व. भाऊंच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमास श्रीरंग घरत, जगदीश नागे, विनोद टेंबुलकर, देवळेकर, हेमकांत सोनार, प्रभाकर पाटील वाचनालयाच्या ग्रंथपाल ज्योती म्हात्रे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश नागे यांनी, तर आभार मुश्ताकभाई घट्टे यांनी मानले.
मुरुड येथे स्व. प्रभाकर पाटील यांची जयंती साजरी
| आगरदांडा | प्रतिनिधी |
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या म.ह. दिवेकर हायस्कूल वाणदे येथे स्वर्गीय प्रभाकर पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय प्रभाकर पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी हायस्कूलचे चेरमन तुकाराम पाटील, शेकाप तालुका चिटणीस अजित कासार, युवक अध्यक्ष राहील कडू, माजी सरपंच रमेश दिवेकर, अमोल पाटील, श्रीकांत वारंगे, मुख्याध्यापक जठारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चेरमन तुकाराम पाटील यांनी सांंगितले की, भाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष असताना अनेक विकासकामे केलेली आहेत. त्यांचे काम हे प्रत्येक गावात दिसून येत आहे. भाऊंनी जनतेला दिलेला शब्द पाळून विकासाची गंगा रायगड जिल्ह्यात आणली आहे. तालुका चिटणीस अजित कासार यांनी स्व. प्रभाकर पाटील यांच्यासारखा नेता होणेच नाही. शेतकर्यांची दुःख जाणणारा व लोकांचे प्रश्न तातडीने सोडवणारा म्हणून त्यांची ख्याती होती. प्रशासनावर जबरदस्त पकड असणारा लोकनेता म्हणून सर्वच पक्षातील लोक त्यांचा नेहमी आदर करीत असत. विकासाची कामे त्यांच्याच कारकिर्दीपासून सुरु झाली आहेत.अनेक लोकांना त्यांनी नोकर्या सुद्धा लावून आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. याप्रसंगी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी शिक्षकवृंदांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.