शहीद निलेश तुणतुणे यांना अभिवादन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

कारगिल युद्धात शहीद झालेले निलेश तुणतुणे यांचा स्मृतीदिन अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथे गुरुवारी (दि.1) साजरा करण्यात आला. रायगडचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या हस्ते तुणतुणे यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शहीद निलेश तुणतुणे ट्रस्टचे अध्यक्ष द्वारकानाथ नाईक, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील, पोलीस निरीक्षक किशोर साळे, गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, निवृत्त लष्कर अधिकारी उमेश वाणी, नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, आक्षीच्या सरपंच रश्मी पाटील, माजी सरपंच संजय पाटील, अ‍ॅड. के. पाटील, माजी उपसरपंच नरेश वर्तक, श्रीकांत नाईक, शहीद तुणतुणे यांचे वडील नारायण तुणतुणे, आई निर्मला तुणतुणे तसेच त्यांचे नातेवाईक, ग्रामस्थ, महिला, शहीद निलेश तुणतुणे ग्रुप सहाणगोठीचे सर्व पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कारगिल युद्धामध्ये निलेश तुणतुणे शहीद झाले. त्यांच्या कार्याची माहिती सर्वांना मिळावी यासाठी सहाणगोठी येथे स्मृतीदिन साजरा केला जातो. यंदाही हा सोहळा दिमाखात साजरा करण्यात आला. सुरुवातीला रायगड पोलिसांच्या वतीने सशस्त्र मानवंदना देत बंदुकीच्या फैर्‍या झाडल्या. खानाव शाळेतील विद्यार्थी आणि चोंढी येथील वडके हायस्कूलच्यावतीने निलेश तुणतुणे यांना आगळीवेगळी सलामी दिली.

Exit mobile version