शाळेत अवतरल्या सावित्रीच्या लेकी

| म्हसळा | प्रतिनिधी |

रा.जि.प. म्हसळा मराठी शाळेत शनिवारी (दि.3) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले. शाळेतील मुलींनी सावित्रीच्या वेशभूषेत जयंती कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी मुख्याध्यापिका सुमित्रा खेडेकर, इंदिरा चौधरी, उमदी, मुंडे, गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंच्या जीवनावर माहिती सांगून विद्यार्थ्यांना प्रबोधन केले. भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आद्यशिक्षिका आणि महान समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापिका सुमित्रा खेडेकर यांनी पुष्पहार अर्पण करून सावित्रीबाईंना अभिवादन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनीही सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल विचार मांडले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version