| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूडमधील वसंतराव नाईक महाविद्यालयात समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. जनार्दन कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. जनार्दन कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचे कार्य जोपासा. आज मुली शिक्षण घेत आहेत, हे श्रेय समाजसुधारक सावित्री बाई फुले यांना आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. श्रीशैल बहिरगुडे, डॉ. सुभाष म्हात्रे, डॉ.गजानन मुनेश्वर, डॉ. सीमा नाहिद, डॉ. नारायण बागुल प्राध्यापक चिंतन पोतदार, प्रणव बागवे, प्रा.मुस्कान रजब, गणेश लाढ, हरी हवालदार, अस्मिता सादळुकर, अनघा विरकुड, रफी हसवारे आदिंसह प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.







