पनवेल बसस्थानकात समतेचा जागर

| अलिबाग । वार्ताहर ।

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.1 एप्रिल ते दि.1 मे 2023 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन सामाजिक समता पर्व कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे.
त्यानुषंगाने समाज कल्याण विभागाच्या विविध योजना मागासवर्गीय जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पनवेल बसस्थानकात समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जागर समतेचा या पथनाट्यातून सामाजिक न्याय विभागाच्या अनूसूचित जातीतील नवउद्योजकांना स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत मार्जिन मनी, पद्दश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे, वृध्दाश्रम योजना, कन्यादान योजना, रमाई आवास घरकुल योजना अशा विविध लोकोपयोगी योजनांबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात आली. या पथनाट्यात विनोद नाईक, सार्थक गायकवाड, तुषान मढवी, हर्षदा होगाडे, समृद्धी पाटील, नेहा पाटील, श्‍वेता खारकर,निशांत नवाखारकर आदी कलाकार सहभागी झाले होते.
या पथनाट्याचे नेतृत्व राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी तथा प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी यांनी केले असून यावेळी या कार्यक्रमास एसटी बस स्थानक पनवेलचे श्री.म्हात्रे, कार्यालय अधीक्षक, मुलींचे शासकीय वसतिगृह, पनवेल व पाली-सुधागड मिनाक्षी नरहरे, समतादूत पनवेल सदानंद जाधव, समतादूत पनवेल रागिणी साखरकर यांसह बहुसंख्य प्रवासी उपस्थित होते.

Exit mobile version