भोराई शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी संभाजी ढोपे

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
भोराई शिक्षण प्रसारक मंडळ नांदगाव संचलित भोराई शिक्षण प्रसारक मंडळ सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित नांदगाव या संस्थेची 2022-23 ते 2027-28 साठी नवीन कार्यकारणी नुकतीच बिनविरोधात जाहीर झाली.

सदर कार्यकारणीमध्ये सर्वसाधारण गटासाठी अशोक शिंदे, सुधीर सावंत, महिंद्र निकुंभ, मनोज शिर्के, काशिनाथ पवार, सिताराम भोईर, इमासाठी संभाजी ढोपे, विजा/भज. बबन पालवे, अनुसूचित जाती /जमाती नागेश सायगावकर, महिला राखीव वैशाली कर्णिक, तन्मयी शिंदे अशी एकूण अकरा उमेदवारांनी नामनिर्देशन केले होते. संस्थेचे संस्थापक सुरेश खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली व निवडणूक निर्णय अधिकारी मंगला जाधव यांच्या उपस्थितीत सदर संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली असून पदाधिकारी निवडही जाहीर झाली. पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संभाजी ढोपे, उपाध्यक्षपदी बबन पालवे तसेच सलग दुसर्‍यांदा सचिवपदी अशोक शिंदे तर खजिनदार सुधीर सावंत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.

Exit mobile version