संभाजीराजेंनी घेतली मागासवर्ग आयोगाची भेट

| मुंबई | वृत्तसंस्था ।

मराठा समाजाला आरक्षण कशाप्रकारे मिळू शकते, सर्वोच्च न्यायालयाचे काय म्हणणे आहे. या सह अन्य बाबींवर राज्य मागासवर्ग आयोगाशी चर्चा केल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. संभाजीराजे आणि राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक शनिवारी पुण्यात पार पडली. आयोगा सोबतच्या भेटीनंतर संभाजीराजेंनी भेटीत काय चर्चा झाली याची माहिती दिली.

समाजातील लोकांवर अन्याय होत आहे. काही विषय मांडण्यासाठी आम्ही आज येथे आलो होतो, असे संभाजीराजे म्हणाले. राज्य मागासवर्ग हा स्वतंत्र आयोग आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणाचे बंधन नाही. त्यांनी आमची बाजू ऐकून घेतली. पण, त्यांनी काही उत्तरे दिली नाहीत. याकडेही त्यांनी लक्ष वेधेले. महाराष्ट्रात आज वेगळी सामाजिक परिस्थिती निर्माण झाली आहे. दहा बारा समाजाचे प्रश्न आयोगासमोर मांडले. आयोगाला अनेक प्रश्न दिले आहेत. कुणबी मराठा आरक्षण देता येते का, याच्यात काय काय आहे, मराठा, कुणबी एकच आहे. त्यामुळे सरसकट आरक्षण देता येते का, असेही आयोगाला विचारल्याचे संभाजीराजेंनी स्पष्ट केले.
आमचे सर्व प्रश्न सकारात्मकतेने ऐकले. विषय जितका सोपा दिसतो तितका सोपा नाही. आम्हाला अभ्यास करावा लागेल. आजपासून काम सुरू करणार असे आयोगाने सांगितल्याचे संभाजीराजे म्हणाले.

राज्य मागासवर्गाचे कार्यालय हे हजार स्क्वेरफिट पण नाही. मागासवर्ग आयोगाला पैसे दिल्याशिवाय आयोग चालणार नाही. सरकारने ताबडतोब सगळ्या सेवासुविधा आयोगाला देऊन मदत करावी, अशी मागणी संभाजीराजेंनी सरकारला केली.

Exit mobile version