समीर-क्रांती वानखेडे पुन्हा न्यायालयात


| मुंबई | वृत्तसंस्था |
कार्डिलिया क्रूझ प्रकरणापासून चर्चेत राहिलेले समीर वानखडे आणि त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी गुगल, ट्वीटर आणि फेसबुक यांना न्यायालयात खेचले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून वानखडे कुटुंबियांवर खालच्या पातळीत भाष्य करणार्‍या किंवा बदनामी करणार्‍या पोस्ट गुगल, ट्वीटर आणि फेसबुक यांनी थांबवाव्यात आणि त्या काढून टाकाव्यात, असे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी विनंती वानखडे कुटुंबियांच्या वतीने करण्यात न्यायालयात केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 डिसेंबर रोजी दिंडोशी कोर्टात होणार असल्याची माहिती वानखडे यांचे वकील रोहन जनार्दन यांनी दिली आहे.

Exit mobile version