| कोलाड | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील आंबेवाडी गावाचे सुपत्र समीर साळूंके हे भारतीय सैन्य दलातून 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने शुक्रवारी (दि.2) मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी बाजारपेठेतील अंबर सावत महाराज मंदिर येथून पुई-गोवे रस्त्यावर असणाऱ्या त्यांच्या निवास्थानापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
देशाची सेवा करणाऱ्या भारतीय सैनिकांचा सर्वांना अभिमान असतो. आंबेवाडी गावचे सुपत्र समीर साळूंके हे काश्मीरसह देशाच्या विविध राज्यांत 17 वर्षे 6 महिने देशसेवा करून सेवानिवृत्त झाले. काश्मीरच्या गुलाबी थंडीत हिरव्या रंगाच्या वेशात देशाची सेवा करणे भाग्यवान व्यक्तीच्या नशिबात असते. ज्यावेळी भारतीय सैन्यातुन सेवानिवृत्त होतो, त्यावेळी त्या भारतीय सैनिकाचे संपूर्ण कुटूंबासहित त्या परिसरातील नागरिकांना सार्थ अभिमानाचा असतो. त्याप्रमाणे समीर साळूंके यांनी भारतीय सैन्य दलात देश सेवा करून सेवा निवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती सेवा निमित्ताने आंबेवाडी बाजारपेठेतुन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आंबेवाडी ग्रामस्थ, बाजारपेठेतील व्यापारी वर्ग, नाभिक समाज, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.







